Jalgaon married woman raped in Bihar जळगावच्या विवाहितेवर बिहारमध्ये बलात्कार
Jalgaon married woman raped in Bihar जळगाव : जळगावातील 29 वर्षीय विवाहितेचा पतीसोबत वाद झाल्यानंतर तिचा विश्वास संपादन करून तिला बिहारमध्ये येथे बोलावून तिच्यावर अत्याचार करण्यात आला. या प्रकरणी जळगाव एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. राजेशकुमार जयनारायण पासवान (संतोर, सहरसा, नारायणपूर, बिहार) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयीताचे नाव आहे.
कौटूंबिक वादानंतर सोडले घर
29 वर्षीय पीडीता मूळची औरंगाबाद जिल्ह्यातील रहिवासी असून ती कामानिमित्त जळगावातील एका भागात पतीसह राहते. विवाहितेचा पतीसोबत कौटुंबिक वाद झाला. यावेळी पीडीतेसोबत काम करणारा राजेशकुमार जयनारायण पासवान (संतोर, सहरसा, नारायणपूर, बिहार) याने फोनवरून संवाद साधत विश्वास संपादन केला. त्यानंतर राजेशकुमार याने पीडीतेला बिहारमधील गावाकडे बोलावत तिच्यावर 6 ते 9 सप्टेंबरदरम्यान बलात्कार केला तसेच घटनेची वाच्यता कुणाकडे न करण्याबाबत धमकी दिली. याप्रकरणी जळगाव एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक दीपक जगदाळे करीत आहेत.

