यावलमध्ये अंगावर गरम तेल पडल्याने तरुण होरपळला : नास्ता करण्यासाठी आल्यानंतर दुर्घटना


Hot oil spilled on youth in Yaval : Accident after coming for breakfast यावल : शहरातील भुसावळ टि-पॉइंट जवळील एका अल्पोहारच्या दुकानात नाश्ता करण्यास गेलेल्या 20 वर्षीय तरुणाच्या अंगावर गरम तेल पडल्याने तरुण जखमी झाला. ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून त्यास जळगावी हलवण्यात आले.

तरुणास जळगावी हलवले
चंद्रकांत बळीराम बाविस्कर (20, रा.वढोदे, ता.यावल) हा तरुण यावल शहरातील भुसावळ रस्त्यावर असलेल्या एका अल्पोहाराच्या दुकानात नाश्ता करण्यासाठी गेला असता तेथे गरम तेल अंगावर पडल्याने त्याच्या उजव्या बाजुने डोके व पाठ भाजली गेली.

यावल ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार
यावल ग्रामीण रुग्णालयात त्यास उपचाराकरीता दाखल केले असता डॉ.पवन जैन, अधिपरीचारीका मनिषा धांडे, संजय जेधे यांनी प्रथमोपचार केले व त्यास पुढील उपचारा करीता जळगाव जिल्हा रुग्णालयात हलवले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !