भडगाव तालुक्यातील अल्पवयीन मुलीची छेडखानी : एकाविरोधात गुन्हा
Molestation of minor Girl in Bhadgaon Taluka : Crime Against One भडगाव : शाळेत गेलेल्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलीची छेड काढल्याप्रकरणी एका संशयीताविरोधात भडगाव पोलिसांत पोस्को कायद्याने गुन्हा दाखल करण्यात आला.
शिविगाळ करीत विनयभंग
पीडीत अल्पवयीन मुलगी गुरुवार, 6 रोजी शाळेत गेली असता शाळा सुटल्यानंतर संशयीत आरोपी उमेश नंदुलाल पाटील याने विनयभंग केला. मुलीच्या आजीने संशयीताला जाब विचारला असता, संशयीताने शिविगाळ केल्याने अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

