यावल शहरात ईद मिलादुन्नबी मिरवणुकीवर हिंदू बांधवांनी केली फुलांची उधळण


यावल : शहरात रविवारी मोठ्या उत्साहात ईद मिलादुन्नबीची मिरवणूक काढण्यात आली. सकाळच्या सत्रात ही मिरवणूक निघाली तर हिंदू समाज बांधवांनी मुस्लिम समाजाच्या मिरवणुकीवर पुष्पांचा वर्षाव करीत राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडवले.

मिरवणुकीने वेधले लक्ष
शहरातील मुख्य मार्गावरून निघालेल्या या मिरवणुकीने शहर वासीयांचे लक्ष वेधले होते तर अनेक ठिकाणी मिठाई वाटप करण्यात आली. शहरात रविवारी ईद मिलादुन्नबीची मिरवणूक सुदर्शन चौकातून काढण्यात आली. मोठ्या उत्साहात ही मिरवणूक निघाली. हजारोच्या संख्येत मुस्लिम समाजबांधव यात सहभागी झाले. मुस्लिम समाज बांधवांच्या या मिरवणुकीचे स्वागत सुदर्शन चौकात भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष उमेश फेगडे, शहर अध्यक्ष डॉ.निलेश गडे, राहुल फेगडे, शेख अल्ताफ, शेख काबीज तसेच स्वामी विवेकानंद नगरात नितीन चौधरी, बळीराम धोबी, यशवंत बारी, माजी सैनिक राजेंद्र कदम, सुभाष बडगुजर, फारुख शेख मुंशी, असलम शेख मुंशी, चंद्रकांत येवले, माजी नगरसेवक शेख असलम शेख नबी, राष्ट्रवादीचे कलीम मन्यार, आदींनी पुष्प वर्षाव करीत राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडवले. मोठ्या उत्साहात नाते पाक पठण करीत ईद मिलादुन्नबीची ही मिरवणूक शहरातून काढण्यात आली. मिरवणूक मार्गावर यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला.

रक्तदान शिबिराचे आयोजन
शहरात ईद मिलादुन्नबीनिमित्त पीस एज्युकेशनल अ‍ॅण्ड वेल्फअर सोसायटीकडून सेंट्रल बँकेजवळ रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यात 52 दात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले. अध्यक्षस्थानी इकरा संस्थाध्यक्ष अ.करीम सालार तर उद्घाटन माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांनी केले. मौलाना खालील अहेमद, जिल्हा परीषदेचे माजी गटनेता प्रभाकर सोनवणे, कदीर खान, माजी नगराध्यक्ष राकेश कोलते, शेखर पाटील, धनंजय चौधरींसह आदींची उपस्थिती होती. पीस एज्युकेशनल वेल्फेअर सोसायटी यावल, अध्यक्ष कदीर खान, उपाध्यक्ष असलम सर, सचिव निहाल अहमद, खाजिनदार हाजी हकिम सेठ, सदस्य युनूस मिंसुरी, अकिल अहमद, ईकबाल खान, हाफिज खान, शोएब अहमद, शेख अजहर, उसमान खान, रईस शेख आदी उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !