जळगाव घरफोडीचे सत्र कायम : चार लाखांच्या ऐवजावर डल्ला
Jalgaon burglary session continues : Dalla on compensation of four lakhs जळगाव : शहरात सातत्याने चोर्या-घरफोड्या सुरूच आहेत. अयोध्या नगर भागातील उषा ई. रेसिडेन्सीमधील फ्लॅटमधून चोरट्यांनी सोने-चांदीच्या दागिन्यांसह एक लाखांची रोकड असा एकूण 3 लाख 97 हजार 117 रुपयांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला.
बंद घरे चोरट्यांना पर्वणी
सनी विकास सोनार (32) यांनी फिर्याद दिल्यानुसार 2 जानेवारीच्या सायंकाळी 5 : 45 ते 7 : 45 च्या दरम्यान, अज्ञात चोरट्याने मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. यानंतर बेडरूममधील लाकडी कपाटातील लॉकर तोडून त्यातील एक लाखांची रोकड आणि सोने-चांदीचे दागिने असा एकूण एकूण तीन लाख 97 हजार 117 रुपयांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी करीत आहेत.


