आ.बं.मुलांचे हायस्कूलतर्फे चाळीसगाव आगार व्यवस्थापकांचा गौरव


Chalisgaon Agar managers were honored by A.B. Boys’ High School चाळीसगाव : चाळीसगाव आगार व्यवस्थापक, उच्च विद्याविभूषित संदीप कृष्णा निकम यांचा सत्कार आनंदीबाई बंकट मुलांचे हायस्कुलचे चेअरमन योगेश अग्रवाल यांच्याहस्ते त्यांच्या कार्यालयात जाऊन करण्यात आला. खेड्यावरून ये-जा करणार्‍या शालेय विद्यार्थ्यांना भेडसावणार्‍या पासेस, तसेच बसच्या वेळापत्रकातील अडचणी तत्काळ सोडवल्याबद्दल व शालेय विद्यार्थ्यांच्या प्रत्येक समस्येला तात्काळ न्याय दिल्याबद्दल चेअरमन योगेश अग्रवाल यांनी आगार व्यवस्थापक संदीप निकम यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या कार्याचा सत्कार केला.

यांची होती उपस्थिती
यावेळी सत्काराला उत्तर देतांना निकम म्हणाले की, बसेसने प्रवास करणारा खेड्यापाड्यातील विद्यार्थी हा तळागाळातून आलेला असतो. त्यांच्या समस्यांना आम्ही नेहमी सोडवण्यासाठी प्रयत्नशील असतो व भविष्यातदेखील काहीही अडचणी आल्यात तरी आम्ही त्या तत्काळ सोडवू, अशी ग्वाही दिली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक के.एन.तडवी, उपमुख्याध्यापक बा.बा. सोनवणे, ज्येष्ठ शिक्षक दत्तू सावळे, कलाशिक्षक चेतन कुर्‍हाडे, चित्रकार कवी दिनेश चव्हाण, सुभाष गायकवाड, धनराज वाघ आदी उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !