भडगावात शिक्षकाकडे धाडसी घरफोडी : 45 हजारांचा ऐवज लंपास


Daring home burglary of a teacher in Bhadgaon: 45 thousand instead of compensation भडगाव  : शहरातील कोठडी रोड भागातील शिक्षकाचे बंद घर फोडून चोरट्यांनी 45 हजारांचा ऐवज लांबवला. या प्रकरणी भडगाव पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा
शहरातील कोठली रोड भागात शिक्षक शरद माधवराव पाटील (51) हे कुटुंबासह वास्तव्यास आहेत. पाटील कुटुंब कामानिमित्त बाहेरगावी गेल्याची संधी चोरट्यांनी साधली. चोरट्यांनी दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून 25 हजार रुपये किंमतीचे दागिने व 20 हजारांची रोकड मिळून 45 हजारांचा ऐवज लांबवला. तपास सहाय्यक निरीक्षक चंद्रसेन पालकर करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !