भुसावळातील गौरव बढेच्या हद्दपार आदेशाला नाशिक आयुक्तांची स्थगिती
Nashik Commissioner suspends the deportation order of Gaurav Bhe from Bhusawal भुसावळ : पोलिस दप्तरी विविध गुन्हे दाखल असलेला संशयीत गौरव सुनील बढे (जुना सातारा, भुसावळ) यास जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दोन वर्षासाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार केले होते. हद्दपारीच्या आदेशाविरोधात नाशिक आयुक्तांकडे अपिल दाखल करण्यात आले होते. सुनावणी अंती अपिल मंजूर करण्यात आले असून हद्दपारीच्या आदेशाला स्थगिती देण्यात आली आहे.
अपिलात मिळाला दिलासा
गौरव बढे यांना 28 सप्टेंबर 2022 रोजी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार केले होते मात्र या आदेशाविरोधात अॅड.जावेद मेमन यांच्यामार्फत अपिल दाखल करण्यात आले व त्यात सुनावणी होवून बढे यांच्या हद्दपारीला स्थगिती देण्यात आली आहे. त्याबाबतचे आदेश नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयातील सामान्य प्रशासन विभागातील तहसीलदार योगेश शिंदे यांनी 29 डिसेंबर रोजी काढले आहेत.


