भुसावळातील बियाणी मिलिटरी स्कूलच्या मॅरेथॉनमध्ये धावले एक हजार विद्यार्थी
भुसावळ : शहरातील बियाणी मिलिटरी स्कूलमध्ये आंतरशालेय मॅरेथॉन स्पर्धा दिनांक मंगळवार, 10 जानेवारी रोजी झाल्या. मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन न हिरवी झेंडी दाखऊन बियाणी एज्युकेशन ग्रुपचे अध्यक्ष मनोज बियाणी, सेक्रेटरी संगीता बियाणी यांनी केले. यावेळी बियाणी एज्युकेशन ग्रुपच्या सदस्या स्मिता बियाणी, पियुष बियाणी, राजीव पारीख, प्रवीण भराडीया, प्रिन्सिपल डी.एम.पाटील उपस्थित होते.
पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचा सहभाग
स्पर्धा एक किलोमीटर दोन किलोमीटर व पाच व आठ किलोमीटर अशा अंतरात घेण्यात आल्या. यात मोठा गट व लहान गट असे दोन गट तयार करण्यात आले होते. इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थी मॅरेथॉन मध्ये धावले. यावेळी संगीता बियाणी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की तुम्हाला योग्य तसे फिटनेस हवे असल्यास तुम्हाला धावावेच लागेल, तसेच धावल्याने आपली प्रकृती चांगली असते. वाहतूक विभागाचे पोलीस कर्मचारी व शिक्षक कर्मचारी यांनी स्पर्धा यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.


