भुसावळात तरुणावर चाकूहल्ला : मैत्रीणीत भांडण लावल्याच्या वादातून घटना
Knife attack on young man in Bhusawal : The incident was caused by a quarrel between his girlfriend भुसावळ : मैत्रीणीत भांडण लावल्याच्या वादातून शहरातील सोमानी गार्डनजवळ शिक्षण घेत असलेल्या 17 वर्षीय तरुणावर चाकूने हल्ला करण्यात आला. या प्रकरणी एकाविरोधात भुसावळ शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
तरुणाविरोधात पोलिसात गुन्हा
जय अनंत भिरूड (17, शांती नगर, भुसावळ) या तरुणाच्या तक्रारीनुसार, 8 रोजी रात्री पावणेआठ वाजेच्या सुमारास शांती नगरातील ज्ञानेश्वर गार्डनजवळ संशयीत आरोपी चैतन्य रूपेश पाटील (जुना सातारा, भुसावळ) याने तू माझ्या मैत्रीणीशी बोलून आमच्याच भांडण लावल्याचे म्हणत सोबत आणलेल्या चाकूने कमरेच्या डाव्या बाजूवर हल्ला केला व दुचाकी (एम.एच.19 -1797) वरून पळ काढला. तपास पोलिस निरीक्षक गजानन पडघण यांच्या मार्गदर्शनाखाली नाईक अब्दुल रज्जाक खान करीत आहेत.


