पहिली पत्नी असतानाही दुसरीशी केला घरोबा : अत्याचारातून पीडीतेने दिला तीन मुलांना जन्म ; सात संशयीताविरोधात गुन्हा


Although he was the first wife, he married the second one : the victim gave birth to three children due to torture; Crime against seven suspects चोपडा : पहिली पत्नी असताना व तिला सहा अपत्य असतानाही चोपडा तालुक्यातील 29 वर्षीय तरुणीची लग्नाच्या आमिषाने फसवणूक केल्याप्रकरणी पतीसह सात संशयीतांविरोधात न्यायालयाच्या आदेशावरून गुन्हा दाखल करण्यात आला.

सात संशयीताविरोधात गुन्हा
चोपडा तालुक्यातील एका गावातील 29 तरुणीशी संशयीत आरोपीने लग्नाच्या आमिषाने 2016 ते 2021 पर्यंत अत्याचार केला व या पाच वर्षाच्या काळात पीडीतेला तीन मुले झालीत. मात्र आरोपीचे यापूर्वीच लग्न झाले असून त्यास पहिल्या पत्नीपासून सहा अपत्ये झाल्याचे लक्षात आल्याने आपली दिशाभूल करुन षडयंत्र, कटकारस्थान रचून हे सगळे केले गेल्याचा आरोप पिडीतेने करीत न्यायालयात धाव घेतली. घरातील सदस्यांनी पिडीतेस घरातून माहेरी हाकलून देत तिची फसवणूक केल्याने पीडीतेच्या तक्रारीवरून संजय मुनशी बारेला, मुन्शी भारता बारेला, सनबाई मुन्शी बारेला, कमलेश मुन्शी बारेला, सुशीला कमलेश बारेला, चेतन मुन्शी बारेला, पिंकी संजय बारेला (सर्व रा.चोपडा तालुका) यांच्याविरोधात न्यायालयाच्या आदेशान्वये चोपडा ग्रामीण रुग्णालयात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अमरसिंग वसावे करीत आहेत.



 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !