तुमच्याकडे लक्ष्मी आली म्हणत भामट्याने भरदिवसा महिलेची सोन्याची पोत लांबवली : जळगावातील प्रकार


Bhamtya stretched out the woman’s golden cloth in broad daylight saying Lakshmi has come to you : Jalgaon style
जळगाव : तुमचे भविष्य सांगतो, तुमच्या घरी लक्ष्मी आली असून रस्त्याने पायी चालणार्‍या वृद्धेला ठगवत दोघा भामट्यांनी 40 हजारांची सोन्याची पोत लांबवल्याची घटना शहरात नूतन मराठा महाविद्यालय परीसरात बुधवारी घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दोन अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

नातीकरीता जेवणाचा डबा जात असताना भामट्याने गाठले वृद्धेला
कानळदा येथील कमलाबाई रामचंद्र सोनवणे या वृद्धा कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. जळगावातील त्यांच्या नातीला बाळंतपणासाठी शाहूनगरातील हॉस्पिटलमध्ये दाखल केले असून बुधवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास कमलबाई या नातीकरीता जेवणाचा डबा देण्यासाठी गेल्या होत्या. डबा देवून दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास त्या पायी घराकडे जाण्यासाठी निघाल्या असतानाच नूतन मराठा कॉलेजच्या समोर युनिक अकॅडमी समोरील रोडने आलेल्या दोघा भामट्यांनी त्यांना थांबवले. तुमच्या घरी लक्ष्मी आली आहे. मी तुमचे भविष्य सांगतो, असे म्हणून रस्त्याच्या बाजूला बसवले. बोलण्यात गुंतवणूक कमलबाई यांच्या गळ्यातील सोन्याची पोत काढून घेत कागदाच्या पुडीत ठेवून भामट्यांनी कागदाची पुडीची अदला-बदली केली. त्यानंतर दुनियादारी चांगली नाही तुझ्या गळ्यातील पोत कागदावर ठेव आणि घरी गेल्यावरच उघड, असे त्यांनी वृद्धेला सांगितले.



कागदाच्या पुडीची अदलाबदली !
वृद्धेने गळ्यातील पोत काढून कागदावर ठेवत शाहूनगर परीसरातील हॉस्पिटलमध्ये गेली. यानंतर वृद्ध महिलेने हातातील पुडी आपल्या नातीकडे दिली. तिने पुडी उघडून बघितली असता त्यात सोन्याची पोत दिसून आली नाही. आपली फसवणुक झाल्याची खात्री झाल्यानंतर गुरुवारी वृद्धेने शहर पोलिसात धाव घेत तक्रार दिल्याने दोन अज्ञात भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार सिकंदर तडवी करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !