रावेर शहरात अवैध वाळू वाहतूक करणारा ट्राला पकडला


A trawler carrying illegal sand was caught in Rawer Town रावेर : शहरात मध्यरात्रीच्या सुमारास अवैधरीत्या वाळू वाहतूक करणारा ट्राला प्रशिक्षणार्थी तहसीलदार यांच्या नेतृत्वाखाली महसूल पथकाने पकडल्याने वाळू व वाहतूकदारांमध्ये खळबळ उडाली आहे. रावेर शहरात मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू वाहतूक सुरू असल्याची ओरड होत असतांना झालेल्या कारवाईमुळे वाळुूव्यवसायिकांचे धाबे दणाणले आहे.

वाळू वाहतूकदारांवर हवी कारवाई
मध्यरात्रीच्या सुमारास ट्राला क्रमांक (एम.एच. 20 ई.जी.6197) या ट्रालाच्या माध्यमातून वाळू रावेर शहरात खाली होत असताना प्रशिक्षणार्थी तहसीलदार डॉ.मयूर कळसे यांच्या नेतृत्वाखाली महसूल पथकाने ट्रालावर कारवाई केल्याने वाळू वाहतूकदारांमध्ये खळबळ उडाली आहे. पाल येथील सुकी नदी पात्रातून दरोरोज शेकडो ब्रास वाळूचा अवैध उपसा सुरू आहे. ट्रकद्वारे ही वाळू रात्री दोन ते तीनच्या सुमारास रावेर रसलपूर, कुसुंबा, सावदा भागात पोहोचवली जात असल्याने पर्यावरणाची मोठी हानी होत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !