पाचोर्यात पुतण्याच्या मृत्यूची बातमी ऐकताच काकूनेही सोडले प्राण
On hearing the news of her nephew’s death in Pachora, the aunt also gave up her life पाचोरा : मृत्यू हा अटळ शाश्वत असलातरी तो केव्हा कोणत्या रुपाने येईल हे कुणीही सांगू शकत नाही. धावत्या रेल्वेच्या धक्क्याने पुतण्याचा झालेला मृत्यूची वार्ता ऐकताच काकूचाही मृत्यू झाला. या घटनेमुळे हनुमान नगर परीसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. सोनार कुटुंबातून एकाच दिवशी दोन अंतयात्रा निघाल्याने ऐन संक्रांतीच्या सणाच्या तोंडावर सोनार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.
रेल्वेच्या धक्क्याने पुतण्याचा मृत्यू
पाचोरा शहरातील हनुमान नगर भागातील रहिवाशी दादाभाऊ मोरे व त्यांचे दोन्ही भावांचे कुटुंब एकाच ठिकाणी वास्तव्यास आहेत. 11 रोजी दादाभाऊ मोरे हे यांचे काकाच्या उत्तरकार्यासाठी वरखेडी, ता.पाचोरा येथे गेले होते. उत्तरकार्य आटोपुन आल्यानंतर त्यांचा लहान मुलगा किरण मोरे (27) हा कामानिमित्त शहरातील दुसर्या भागाकडे जात असतांना पाचोरा ते गाळण रेल्वे स्थानका दरम्यान रेल्वे कि. मी. खंबा क्रं. 369 / 18 ते 369 / 20 दरम्यान रेल्वे लाईन क्रास करत असतांना मुंबई हुन जळगांवच्या दिशेने जाणार्या भरधाव धावत्या रेल्वे (गाडी क्रं. 15548)चा धक्का लागल्याने किरण सोनार यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती रेल्वेचे लोको पायलट जे.एच. देवरे यांनी पाचोरा रेल्वे स्टेशनचे उप स्टेशन प्रबंधक यांना दिल्यानंतर त्यांनी सदरची माहिती पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये दिली.


पाचोरा पोलिसात नोंद
पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक राहुल मोरे, पोलिस कॉन्स्टेबल नरेंद्र नरवाडे हे रुग्णवाहिका चालक अमोल पाटील यांच्या सह घटनास्थळी दाखल होवून पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून किरण सोनार यांचा मृतदेह रुग्णवाहिका चालक अमोल पाटील यांच्या मदतीने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
वार्ता ऐकताच काकूचाही हृदयविकाराने मृत्यू
किरणची आजी, वडिल, आई, काका व भाऊ, बहिण यांनी त्यांच्या अचानक जाण्याने करित असलेल्या दुःखद आक्रोशात त्यांच्या काकु उषाबाई मन्नु सोनार (40) यांना तीव्र ह्रदयविकाराचा झटका आला. त्यांना शहरातील खाजगी रूग्णालयात उपचारासाठी नेले असता त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव हलवण्यात आले. माञ जळगावचा प्रवास करित असतांनाच सामनेर नजीक उषाबाई यांची प्राणज्योत मालवली. गुरुवार, 12 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता उषाबाई यांचा मृतदेह आणला गेला व तासाभरात किरणचा मृतदेह आणण्यात आला. काकु व पुतण्या या दोघांच्या अंत्ययात्रेची तयारी एकाच वेळी करून ट्रॅक्टरवर दोघांची अंतयात्रा काढण्यात आली.
