भुसावळ एस.टी.आगारात सुरक्षितता अभियान


भुसावळ : भुसावळ एस.टी.आगारात 11 ते 25 जानेवारीदरम्यान सुरक्षितता अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. भुसावळ आगारात सहाय्यक पोलिस निरीक्षक हरीष भोये यांच्याहस्ते सुरक्षितता सप्ताहाच्या बॅनरची फीत कापून उद्घाटन करण्यात आले.

सुरक्षितता सप्ताहात कर्मचार्‍यांनी नियमांचे करावे पालन
चालक कर्मचार्‍याना सुरक्षिततेचे बिल्ले लावण्यात आले. याप्रसंगी आगर व्यवस्थापक प्रमोद चौधरी यांनी कर्मचार्‍यांना सुरक्षिततेने वाहन चालवण्यासंबंधी देण्यात आलेल्या सूचनांचे कटाक्षाने पालन करावे व यांत्रिक कर्मचार्‍यांनी बसेसचे ब्रेक्स, क्लच, गिअर व स्टेअरींगची कामे करून घेण्यात यावी, असे सांगितले. त्याचप्रमाणे सेवानिवृत्त एम.ई.ओ. एम.एम.सरोदे यांनीदेखील कर्मचार्‍यांना सुरक्षितता सप्ताहाचे नियमांचे पालन करण्यास आवाहन केले. कार्यक्रम प्रसंगी पोलिस नाईक संदीप परदेशी, आगार व्यवस्थापक प्रमोद चौधरी, स्थानक प्रमुख, पी.बी.भोई, एस.डी.देवकर, जी.एस.कचाटे, एम.एम.सरोदे उपस्थित होते. यशस्वीतेसाठी रामकृष्ण सपकाळे, पी.एम.पाटील, रफिक पिंजारी, सतीश बोंडे यांनी परीश्रम घेतले. सूत्रसंचालन धर्मराज देवकर यांनी केले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !