मेकॅनिक मानवी जीवनाचा अविभाज्य घटक : श्रीराम पाटील
रावेर : मानवी जीवनात प्रत्येक व्यक्तीकडून काहीतरी शिक्षण घेता येते. प्रत्येकाला निसर्गाने ती देणगी दिली आहे. मेकॅनिक हा जगात कुठेही आपली जीववाश्यक गरज भागवू शकतो. जगात प्रत्येक गोष्ट शक्य आहे. केवळ आपला प्रामाणिकपणा, मेहनत आणि महत्वाकांक्षा, जिद्द असावी लागते, असे मते रावेरचे उद्योजक श्रीराम पाटील यांनी व्यक्त केले. श्रीराम ऑटो सेंटर रावेर आयोजीत टु व्हीलर मेकॅनिक स्नेहमिलनात ते बोलत होते.
यांची कार्यक्रमास उपस्थिती
कार्यक्रमात पिंटू महाजन यांची रावेर तालुका खादी ग्रामोद्याग संस्थेच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ मॅकेनिक शेख रऊफ, राजेंद्र जंजाळकर, विश्वास पाटील आदींचा सत्कार करण्यात आला. प्रास्तावीक प्रमोद भावसार यांनी केले. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष शीतल पाटील, ड्रिप असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, ज्येष्ठ पत्रकार दीपक नगरे, खादी ग्रामोद्योग संस्थेचे चेअरमन पिंटू महाजन, डॉ.दीपक पाटील, राजेंद्र चौधरी, लिलाधर जंजाळकर, राजेंद्र जंजाळकर, प्रवीण महाजन, शेख कादीर, सुरेश पाटील, प्रकाश पाटील, शेख रऊफ, शेख जाकीर, शेख आदील, कैलास पाटील, धमेंद्र भावसार, जीवन पाटील, मधुकर चौधरी, मनीष चौधरी, नकुल पाटील, शे.दानीष, शेख शकील, दुर्गेश प्रजापती, मोहन जंजाळकर, जितेंद्र चौधरी, संतोष पाटील, आकाश महाजन, ज्ञानेश्वर पाचपोहे, विजय धनके, आकाश पाटील, कपिल महाजन आदींची उपस्थिती होती. आभार घन:श्याम पाटील यांनी मानले.


