पहूरमधील धाडसी घरफोडीचा उलगडा : दाम्पत्यासह सहा संशयीत एलबीच्या जाळ्यात


Bold house burglary in Pahoor solved: Six suspects including couple in LB’s trap जळगाव : पहूर, ता.जामनेर येथील धाडसी घरफोडी प्रकरणी जळगाव गुन्हे शाखेने दाम्पत्यासह सहा आरोपींच्या मुसक्या बांधल्या आहेत. अटकेतील महिलेने नात्याने मामेभाऊ लागणार्‍या नातेवाईकाकडेच डल्ला मारल्याची बाब उघडकीस आली असून आरोपींकडून 16 लाख 90 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

ऑगस्ट महिन्यात झाली होती चोरी
जामनेर तालुक्यातील पहुर येथे धाडसी घरफोडी झाल्यानंतर पहूर पोलीस ठाण्यात 29 ऑगस्ट 2021 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यातील संशयीत जळगाव शहरातील असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेने सैय्यद सरजील सय्यद हरून (27, रा.मास्टर कॉलनी, जळगाव), अनिल रमेश चौधरी (40, रा.अयोध्या नगर, जळगाव), सैय्यद अराफत सय्यद फारूक (33, रा.तांबापूरा), सय्यद अमीन उर्फ बुलेट सय्यद फारुख (रा.तांबापुरा) व भावना जवाहरलाल जैन (लोढा, 40, रायसोनी नगर, जळगाव) यांच्या मुसक्या बांधत त्यांच्याकडून 16 लाख 90 हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला. पाचही संशयीतांना पुढील कारवाईसाठी पहूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.



यांच्या पथकाने उघडकीस आणला गुन्हा
जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक एम.राजकुमार, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, चाळीसगाव विभागाचे अपर अधीक्षक रमेश चोपडे, जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक फौजदार अनिल जाधव, रवी नरवाडे, पोलिस हेड कॉन्स्टेबल संजय हिवरकर, विजयसिंह पाटील, राजेश मेढे, सुधाकर अंभोरे, कमलाकर बागुल, अनिल देशमुख, अक्रम शेख, पोलीस नाईक संतोष मायकल, नितीन बाविस्कर, नंदलाल पाटील, विजय पाटील, भगवान पाटील, श्रीकृष्ण देशमुख, परेश महाजन, विनोद पाटील, सचिन महाजन, ईश्वर पाटील, महिला पोलीस कॉन्स्टेबल अभिलाषा मनोरे, वैशाली सोनवणे, अश्विनी सावकारे, रूपाली खरे यांच्या पथकाने आरोपींना अटक केली. सहा.निरीक्षक वसंत कांबळे, उपनिरीक्षक सचिन डोंगरे, जयंत चौधरी, विनायक पाटील, किशोर मोरे, सचिन चौधरी यांनी तांत्रिक सहकार्य केले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !