पारोळा तालुक्यातील गतिमंद तरुणी अत्याचारातून तीन महिन्यांची गर्भवती


A dynamic young woman from Parola taluka is three months pregnant after being raped पारोळा : पारोळा तालुक्यातील 21 वर्षीय गतिमंद तरुणीवर नराधमाने अत्याचार केल्याने पीडीता तीन महिन्यांची गर्भवती राहिल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. या प्रकरणी अज्ञाताविरोधात पीडीतेच्या आईच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, पोलिसांकडून आता नराधमाचा शोध सुरू करण्यात आला आहे.

पोटदुखीनंतर प्रकार उघडकीस
21 वर्षीय पीडीता आईसोबत वास्तव्यास आहे. पीडीतेची आई कामानिमित्त शेतात गेल्यानंतर पीडीता घरी एकटीच राहत असल्याचीे पाहून नराधमाने तिच्यावर अत्याचार केला मात्र गुरुवार, 12 जानेवारी रोजी पीडीतेचे पोट दुखत असल्याने स्थानिक डॉक्टरांना धुळे येथील मेडीकल कॉलेज दाखवण्याचा सल्ला दिल्यानंतर तपासणीत पीडीता तीन महिन्यांची गर्भवती आढळली.



अत्याचाराचा गुन्हा दाखल
पीडीता गतिमंद असल्याची तसेच ती घरी एकटी असल्याचा फायदा घेत तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचे स्पष्ट झाल्याने पीडीतेच्या आईने पारोळा पोलिसात अज्ञाताविरोधात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गंभीर शिंदे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !