भुसावळातील मुस्लीम कॉलनीत धाडसी घरफोडी
बंद घरातून 42 हजारांचा ऐवज लंपास : गस्त ठरतेय नावालाच
Daring burglary in Muslim colony in Bhusawal भुसावळ : शहरात चोरट्यांचा उच्छाद थांबायला तयार नाही. जुन्या चोर्या-घरफोड्यांचा तपास थंडबस्त्यात असतानाच सातत्याने नवीन होणार्या चोर्यांमुळे नागरीक धास्तावले आहेत. शहरातील मुस्लीम कॉलनीत कुटुंब गावाला गेल्याची संधी साधून चोरट्यांनी 42 हजारांचा ऐवज लांबवला. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
बंद घरे चोरट्यांना पर्वणी
शहरातील मुस्लीम कॉलनीत मुंताझीर शेख महेमूद (29, बडी खानकाजवळ, मुस्लीम कॉलनी, भुसावळ) हे कुटुंबासह वास्तव्यास आहेत. ते कुटुंबासह गावाला गेल्याची संधी साधून चोरट्यांनी 11 ते 12 जानेवारीदरम्यान त्यांच्या बंद घरातून 12 हजारांची रोकड, 16 हजार 500 रुपये किंमतीचे सोन्याचे पदक, तीन हजार रुपये किंमतीची सोन्याची बाळी, सहा हजार रुपये किंमतीच्या साकळ्या, तीन हजार रुपये किंमतीचे चांदीचे कडे, नऊशे रुपये किंमतीची चांदीचे चैन लांबवली. कुटूंब बाहेरगावावरून परतल्यानंतर चोरी लक्षात आल्यानंतर बाजारपेठ पोलिसात तक्रार दिल्यानंतर अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुनील जोशी करीत आहेत.


