Nitin Gadkari केंद्रीय मंत्री गडकरींची सुरक्षा वाढवली : शंभर कोटींच्या खंडणीसाठी दाऊदच्या नावाने दिली धमकी


नागपूर : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नावाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. या घटनेने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. नितीन गडकरी यांच्या नागपूरमधील कार्यालयात खंडणीच्या मागणीसाठी एकामागून एक असे तीन फोन कॉल आले असून यंत्रणांनी याबाबत चौकशीला सुरूवात केली आहे.

पोलिसांकडून तपासाला सुरूवात
धमकी देणार्‍याने दाऊद इब्राहिम असा शब्द उच्चारत आम्हाला 100 कोटींची खंडणी दिली नाही तर गडकरींना जीवे मारू अशी धमकी दिली. शनिवारी त्यांच्या नागपूर येथील जनसंपर्क कार्यालयात हे धमकीचे फोन आले. सकाळी 11.29 वाजता पहिला फोन आला. त्यानंतर आणखी दोन फोन आले. एक फोन 11.35 वाजता तर तिसरा फोन हा 12.32 वाजता आला. कार्यालयातील कर्मचार्‍यांनी तातडीने त्याची माहिती पोलिसांना देताच तपासाला सुरूवात करण्यात आली.

गडकरींच्या सुरक्षेत मोठी वाढ !
नागपूरमधील ऑरेंज सिटी रुग्णालयाजवळ नितीन गडकरी यांचं संपर्क कार्यालय आहे. शनिवारी सकाळपासून तीन वेळा गडकरी यांच्या कार्यालयात दाऊदच्या नावाने फोन आले. पोलिसांच्या माहितीनुसार, हा फोन कर्नाटकच्या एका भागातून करण्यात आला होता. आता पोलिस फोन करणार्‍याचा शोध घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार गडकरी सध्या नागपुरात असून एका कार्यक्रमात आहेत. हा धमकीचा कॉल आल्यानंतर त्यांच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे तसेच त्यांचे निवासस्थान आणि कार्यालयाचीही सुरक्षा वाढविण्यात आली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !