जमीन खरेदी-विक्री करणार्या व्यावसायीकाला खंडणीसाठी मारहाण : तडीपार टकल्या गवळीविरोधात गुन्हा
Beating up a businessman for buying and selling land for extortion: Case against Tadipar Taklya Gawli चोपडा : तडीपार आरोपीने व्यावसायीकाचा रस्ता अडवत दहा हजारांच्या खंडणीसाठी मारहाण केल्याची घटना शहरातील महावीर नगर भागातील साईबाबा मंदिराजवळ 12 रोजी सायंकाळी साडेसहा वाजता घडली. या प्रकरणी संशयीत व हद्दपार आरोपी वैभव उर्फ टकल्या गोपाळ गवळी (बारीवाडा, चोपडा) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.


रस्ता अडवत दोघांना केली मारहाण
गोवर्धन चैत्राम चौधरी (37, लहान भोई वाडा, चोपडा) हे रीअल इस्टेट क्षेत्रात काम करतात. त्यांच्यासह मित्र लक्ष्मण माधव बारी हे गुरुवार, 12 रोजी सायंकाळी साडेसहा वाजता साईबाबा मंदिराकडून पंकज स्टॉपकडे निघाल्यानंतर आरोपी टकल्या गोपाळ गवळी याने रस्ता अडवत व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी दहा हजारांची खंडणीची मागणी केली मात्र खंडणी देण्यास नकार दिल्याने आरोपीने त्याच्या हातातील लाकडी काठीने डाव्या हातासह पायावर मारहाण करीत पाय फ्रॅक्चर केला. बारी हे भांडण सोडवण्यास आल्यानंतर त्यांनादेखील शिविगाळ करून धमकी देण्यात आली. विशेष म्हणजे आरोपी हद्दपार असतानाही आदेशाचे उल्लंघण करीत शहरात दाखल झाला व त्याने व्यावसायीकाकडे खंडणी मागितल्याची बाब उघडकीस आली आहे. आरोपीविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहा.निरीक्षक अजित सावळे करीत आहेत.
