अल्पवयीन मुलाच्या अत्याचारातून यावल तालुक्यातील 12 वर्षीय अल्पवयीन मुलीने दिला बाळास जन्म


Abused By a Minor : A 12-year-old minor girl in Yawal Taluka gave birth to a Baby यावल : तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीवर अल्पवयीन मुलानेच अत्याचार केल्यानंतर त्यातून पीडीतेने शुक्रवारी मुलास जन्म दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अल्पवयीन मुलाविरोधात यावल पोलिसात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. अल्पवयीन मुलास ताब्यात घेत त्याला विशेष बाल न्यायालयात हजर केल्यानंतर त्याची त्याची बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली.

अत्याचारातून पीडीतेने दिला बाळाला जन्म
यावल तालुक्यातील एका गावात 12 वर्षीय पीडीता कुटुंबासह वास्तव्यास आहे. याच गावातील एका अल्पवयीन तरुणाने अल्पवयीन जीवे ठार मारण्याची धमकी देत सातत्याने मुलीशी संबंध ठेवल्यानंतर पीडीता गर्भवती राहिली व मुलीत झालेल्या बदलानंतर पालकांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्यांनी बदनामीपोटी ही बाब जाहीर केली नाही मात्र गुरुवारी अल्पवयीन मुलीस प्रचंड त्रास होत असल्याने जळगाव जिल्हा शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवल्यानंतर शुक्रवारी तिने एका मुलास जन्म दिला. या प्रकरणी अल्पवयीन मुलाविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुनीता कोळपकर करीत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !