गाडर्यातील बेपत्ता महिलेचा मृत्यू गळफास घेतल्यानेच
Missing woman in car died due to hanging यावल : तालुक्यातील गाडर्या येथील बेपत्ता महिलेचा जंगलात मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. करसना सुभाष बारेला (30, गाडर्या, ता.यावल) असे मृत महिलेचा जंगलात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता मात्र या महिलेने गळफास घेत आत्महत्या केल्याचे शवविच्छेदन अहवालाअंती स्पष्ट झाले आहे.
बेपत्ता प्रकरणी पोलिसात होती नोंद
करसना बारेला या आपल्या परीवारासह वास्तव्याला होत्या. 9 जानेवारीपासून त्या राहत्या घरातून बेपत्ता झाल्याने याबाबत गुरूवार, 12 जानेवारी रोजी यावल पोलिसात हरवल्याची नोंद करण्यात आली होती. दरम्यान या महिलेचा मृतदेह गाडर्या जंगलात आढळून आल्यानंतर तर्क-वितर्क व्यक्त होते होते मात्र वैद्यकीय अधिकार्यांनी जागीच शवविच्छेदन केल्यानंतर या महिलेने गळफास घेतल्याचे स्पष्ट झाल्याने अफवांना पूर्णविराम मिळाला आहे.


यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
या घटनेप्रकरणी गाडर्या गावाचे पोलीस पाटील केरसिंग घाटु बारेला यांच्या खबरीवरून यावल पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रदीप बोरूडे करीत आहे.
