पत्नीस सासरी नांदण्यास न पाठवल्याने सासर्याचा केला खून
Father-in-law was killed for not sending his wife to visit his father-in-law जत : पत्नीला सासरी न पाठवल्याच्या रागातून जावयानेच आपल्या सासर्याचा खून केला. ही घटना पूर्व भागातील दरीबडची येथील गावापासून एक किलोमीटर अंतरावर मल्लाड वस्तीवर घडली. या घटनेत आप्पासाहेब आण्णाप्पा मल्लाड (46) यांचा मृत्यू झाला तर जावई सचिन रुद्राप्पा बळोळी ( 33), जावयाचा भाऊ मिलन रुद्राप्पा बळोळी (31, दोघे रा.ऐगळी, ता अथणी) व इतर दोन अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी मिलन रुद्राप्पा बळळ्ळी याला अटक करण्यात आली.
कोयत्याच्या हल्ल्यात सासर्याचा मृत्यू
आप्पासाहेब मल्लाड हे मुलीला सासरी पाठवत नसल्याच्या रागातून मासाळ वस्तीकडे जाणार्या कुलाळ यांच्या शेतलाजवळ आरोपीने त्यांना रस्त्यावर अडवले. दोघांमध्ये मुलीला नांदवायला पाठवण्यावरुन वाद झाला आणि वादाचे रुपांतर मारामारीत झाले. यावेळी जावयाने अचानकपणे कोयत्याने हल्ला केला. पहिला वार चुकवून आण्णाप्पा पळाले, पण आरोपी हे चौघेजण असल्याने पळून जाण्याचा प्रयत्न यशस्वी झाला नाही. यानंतर आरोपींनी रागाच्या भरात धारदार कोयत्याने वार केला. डोक्यावर मानेवर,चेहर्यावर, कानावर,हातावर 18 वार करण्यात आले. डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी आरोपीची चप्पल, कापड सापडले आहे. धारदार कोयता जप्त करण्यात आला.


