भुसावळ शहरातील आतीश खरात यांना जामीन मंजूर


Atiish Kharat in Bhusawal city granted bail भुसावळ : हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघण केल्याप्रकरणी अटकेतील आतीष खरात यास न्यायाधीश आर.एम.जाधव यांनी 20 हजार रूपयांच्या जात मुचलक्यावर जामीन अर्ज मंजूर करण्यात आला आहे.

शहर पोलिसांनी केली अटक
6 डिसेंबर 2022 रोजी आतीश खरात याने कोणतीही पूर्व परवानगी न घेता शहरातील समता नगरातील प्रतिबंधीत क्षेत्रात गावठी पिस्तूल घेऊन प्रवेश केल्याने शहर पोलिसांनी त्यास अटक केली होती. जळगाव कारागृहात असतांना खरात यांनी अ‍ॅड. सत्यनारायण पाल यांच्यातर्फे जामीन मिळण्या साठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्या अर्जावर कामकाज होऊन सत्र न्यायाधीश जाधव यांनी 20 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर खरात याचा जामीन अर्ज मंजूर केला. तपास पोलिस निरीक्षक गजानन पडघण पुढील तपास करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !