पॉलिशच्या बहाण्याने भरदिवसा 60 हजाराचे दागिने लांबविले : वनकोठ्यातील घटना
Pollish excuses extended 60 thousand jewelry on a day : Vanakoti events एरंडोल : दागिण्यांना पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने तालुक्यातील वनकोठा गावात दोघा भामट्यांनी महिलेचे 60 हजारांचे दागिणे लांबवले. या प्रकरणी कासोद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
भर दिवसा लांबवले दागिणे
नागेश्वर शेनफडू पाटील (30, रा.वसंत सहकारी साखर कारखाना, वनकोठे ता. एरंडोल) हे वीज कंपनीत ऑपरेटर म्हणून कार्यरत आहेत. शनिवार, 14 जानेवारी रोजी सकाळी 11 ते 11.30 च्या दरम्यान, दोन अज्ञात इसमांनी आम्ही दागिने पॉलीश करून देत असल्याची बतावणी केली. यावर विश्वास ठेऊन नागेश्वर पाटील यांनी आपल्या आईचे 16 हजार किंमतीचे पावणे चार ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या फॅन्सी रिंगा, 12 हजार किंमतीचे तीन ग्रॅम वजनाची मनी पोत त्यात दोन ग्रामचे पॅन्डल व एक ग्रॅम मनी, 12 हजार रुपयांची तीन ग्रॅम वजनाचे कानातले लटकन आणि 20 हजार रुपयाचे पाच ग्रॅम वजनाचे कानातील काप असे एकूण एकूण 60 हजार रुपयांचे दागिने पॉलिशसाठी दिले मात्र भामट्यांनी दिशाभूल करून नागेश्वर पाटील यांची फसवणूक करीत दागिणे लांबवले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी कासोदा पोलिसात धाव घेत तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहा.निरीक्षक नीता कायटे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार युवराज कोळी करीत आहेत.


