जळगावात तलवारीच्या धाकावर दहशत : आरोपी जाळ्यात
Terror at sword point in Jalgaon: Accused in jail जळगाव : तलवार बाळगून दहशत निर्माण करणार्या संशयीताच्या जळगाव एमआयडीसी पोलिसांनी मुसक्या बांधल्या आहेत. रीतेश उर्फ चिच्या कृष्णा शिंदे (रामेश्वर कॉलनी, जळगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव असून ही कारवाई शनिवार, 14 जानेवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजता करण्यात आली.
तलवारीच्या धाकावर दहशत
जळगाव शहरातील पंचशील नगर इच्छादेवी मंदिराजवळ परीसरात चिच्या शिंदे हा बेकायदेशीररीत्या हातात लोखंडी तलवार घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी संशयित आरोपीवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार अतुल वंजारी, पोलीस नाईक सुधीर साळवे आीदंच्या पथकाने चिच्या कृष्णा शिंदे (21, रामेश्वर कॉलनी, जळगाव) याच्या मुसक्या बांधल्या. नाईक सुधीर साळवे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक फौजदार अतुल वंजारी करीत आहे.


