पहूरमध्ये गस्तीवरील दोघा पोलिसांवर हल्ला : दोघांविरोधात गुन्हा


Attack on two policemen on patrol in Pahoor : Crime Against Both पहूर : रस्त्यात आडवी लावलेली दुचाकी बाजूला करण्याचे सांगितल्यानंतर राग आलेल्या आरोपींनी गस्तीवर पोलिसांशी हुज्जत घालून त्यांच्या कामात अडथळा निर्माण करीत हल्ला केल्याची घटना शनिवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास शहरात घडलेल्या खळबळ उडाली. या प्रकरणी शेख फिरोज शेख सुपडू व ख्वाजा तडवी (दोन्ही रा.पहूर, ता.जामनेर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयीत पसार झाले आहे.

पोलिसांवरच उचलला हात
शनिवारी रात्री साडेनऊ ते दहा वाजेच्या सुमारास पहूर बसस्थानक परीसरात फत्तेपुर आऊट पोस्ट येथे कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल अनिल सुरवाडे व रवींद्र मोरे यांनी संशयीत आरोपीला रस्त्यात आडवी लावलेली दुचाकी साईडला लावल्याचे सांगितल्यानंतर आरोपींनी वाद घालत पोलीस कॉन्स्टेबल अनिल सुरवाडे यांना मारहाण करीत त्यांचा हात पिरगाळला. जखमी अवस्थेत सुरवाडे यांच्यावर पहूर ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना जळगाव येथील मेडिकल कॉलेजमध्ये उपचारार्थ हलवण्यात आले आहे. हल्ल्यानंतर आरोपी पसार झाले असून त्यांचा कसून शोध सुरू करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !