भुसावळातील जिजामाता प्राथमिक विद्यामंदीरात सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात


भुसावळ : शहरातील श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळ संचलित जिजामाता प्राथमिक विद्यामंदिरात जिजामाता जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी प्रसंगी कलागुणांची उधळण करीत लक्ष वेधले. अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष सोनू मांडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या सचिव उषा पाटील, शालेय समितीचे सदस्य श्रीधर खणके, मंगला वाणी, मिलिंद गोरवाडकर उपस्थित होते. शाळेच्या माजी विद्यार्थिनी आणि नाट्यकलावंत धनश्री जोशी उद्घाटक म्हणून उपस्थित होत्या.

बहारदार नृत्यांनी वेधले लक्ष
कार्यक्रमात इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी गणेश वंदना, जिजामातेचा पाळणा, बीज जसे अंकुरते मराठी गौरव गीत, डोल डोलतय वार्‍यावर कोळीगीत, अष्टमी साँग, पढोगे लिखोगे गीत, सैनिकांच्या जीवन संघर्षावर आधारीत प्रसंग नृत्य, राजस्थानी लोकनृत्य घुमर सादर केले. प्रमुख पाहुण्यांचा परीचय सुमेध वानखेडे यांनी करून दिला. सूत्रसंचालन आनंद सपकाळे तर आभार मनीषा राजपूत यांनी मानले. यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका अलका सुरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी सहकार्य केले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !