भुसावळच्या नाहाटा महाविद्यालयाचे प्रा.संदेश धूम यांना पीएच.डी. प्रदान


भुसावळ : ताप्ती एज्युकेशन सोसायटी संचालित भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयतील व्यावसायिक अर्थशास्त्र व बँकिंग विभागाचे विभाग प्रमुख प्रा.एस.टी.धूम यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव मानव्यविद्या शाखेअंतर्गत अर्थशास्त्र विषयातील नाशिक जिल्ह्यातील आदिवासी कोकणा समाजाचे आर्थिक व सामाजिक स्थितीचे अध्ययन या संशोधन विषयावर उपप्राचार्य डॉ.ए.डी.गोस्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली पी.एच.डी पदवी प्रदान करण्यात आली.

निवडीनंतर अभिनंदनाचा वर्षाव
या यशाबद्दल ताप्ती एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष डॉ.मोहन फालक, चेअरमन महेश फालक, सचिव विष्णू चौधरी, कोषाध्यक्ष संजयकुमार नाहाटा व संस्थेचे सर्व सन्माननिय पदाधिकारी तसेच महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ.एम.व्ही.वायकोळे, प्रभारी प्राचार्य डॉ.एस.व्ही.पाटील, उपप्राचार्य डॉ.बी.एच.बर्‍हाटे, उपप्राचार्य डॉ.एन.ई.भंगाळे, मराठी विभाग प्रमुख डॉ.जे.एफ.पाटील तसेच माजी अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा. व्ही.डी.पाटील, अर्थशास्त्र विभागातील सर्व प्राध्यापक, महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचार्‍यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !