कांस्यपदक विजेता खेमचंदचा जय गणेश फाउंडेशनतर्फे सन्मान
भुसावळ : आशियाई किक बॉक्सिंग स्पर्धेत कांस्यपदक मिळविलेल्या खेमचंद मोहन पाटील याचा जय गणेश फाऊंडेशनतर्फे सन्मान करण्यात आला.अध्यक्षस्थानी फाऊंडेशनचे अध्यक्ष चैत्राम पवार होते.
यांची कार्यक्रमास उपस्थिती
नुकत्याच थायलंड येथे पार पडलेल्या आशियाई किक बॉक्सिंग स्पर्धेत भुसावळ येथील आनंदराव कॉलनी, पाटील मळा परीसरातील रहिवासी खेमचंद मोहन पाटील याने भारताचे प्रतिनिधीत्व करून कांस्य पदक मिळविले. आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी त्याची निवड झाल्याने त्यानिमित्ताने जय गणेश फाऊंडेशनच्या वतीने खेमचंद याच्या सत्कार करण्यात आला. यावेळी त्याच्या माता-पित्यांसह त्याचा सन्मान पत्र, पुष्पहार व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी जय गणेश फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, समन्वयक गणेश फेगडे, कोषाध्यक्ष प्रवीण पाटील, स्पोर्ट्स क्लब अध्यक्ष तुषार झांबरे, ज्येष्ठ नागरीक संघाच्या अध्यक्ष सुनंदा औंधकर, सचिव जयश्री ढाके, बोबडे तसेच फाऊंडेशन व ज्येष्ठ नागरीक संघाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते .यावेळी सत्काराला उत्तर देतांना खेमचंद पाटील याने किक बॉक्सिंग मध्ये ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा मनोदय व्यक्त केला. सन्मानपत्र वाचन दिनकर जावळे यांनी तर सूत्रसंचालन जयश्री ढाके यांनी केले.


