श्री गजानन महाराज फाउंडेशनतर्फे साकळी ते शेगाव पदयात्रेचे 22 रोजीे आयोजन
यावल : तालुक्यातील साकळी येथील श्री सच्चिदस्वरूप बहुउद्देशीय संस्था संचलित श्री गजानन महाराज फाउंडेशन, साकळीतर्फे दरवर्षाप्रमाणे यंदाही 22 ते 26 जाने.2023 दरम्यान साकळी ते श्री संतनगरी शेगाव पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या 12 वर्षापासून या फाउंडेशनतर्फे पदयात्रेचे आयोजन केले जात आहे. या पदयात्रेचे या वर्षाचे विशेष म्हणजे यंदाच्या वर्षी पदयात्रेत नव्याने बनवण्यात आलेला आकर्षक व लक्षवेधी असा महाराजांचा रथ सहभागी होणार आहे .महाराजांचा रथ हा असंख्य भाविक- भक्तांच्या योगदानातून साकारण्यात आला आहे. पदयात्रेच्या दिवशी मनवेल रस्त्यावरील जोशीज फार्म येथील श्री गजानन महाराजांच्या मंदिरात महाराजांच्या मूर्तीस साकळी येथील हजरत रशीदबाबा आश्रमाचे गादीपती जितेंद्र नेवे (छोटूबाबा) यांच्या हस्ते अभिषेक व पूजाविधी तसेच महाआरती केली जाणार आहे. यानंतर मंदिरापासून पदयात्रेला सुरुवात होईल.
पदयात्रेत सहभागाचे आवाहन
पदयात्रेत सहभागी होण्यासाठी श्री गजानन महाराज फाउंडेशनचे अध्यक्ष अनिल जोशी यांचे सह मुकेश बोरसे (टेलर), वासुदेव मोते, पितांबर बडगुजर, हर्षल बाविस्कर, मनोज शिरसाळे, पत्रकार चंद्रकांत नेवे, अमोल मोते, जगदीश मराठे, ईश्वर बडगुजर, जगदीश चौधरी, सुरेश देवमन चौधरी, गोपाल अलकरी (शिरसाड), दीपक अण्णा पाटील (मनवेल), भरत पाटील (मनवेल), पत्रकार प्रकाश चौधरी (चुंचाळे), गणेश जोशी (यावल), ललित बारी (यावल) यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन फाउंडेशनच्या वतीने करण्यात आलेले आहे.


