कंडारीतील कपिलेश्वर महादेवाचे हजारो भाविकांनी घेतले दर्शन

यात्रोत्सव उत्साहात :  कोरोनानंतर प्रथमच झालेल्या यात्रोत्सवात लाखोंची उलाढाल


Thousands of devotees took darshan of Kapileshwar Mahadev in Kandari भुसावळ : तालुक्यातील कंडारीतील प्रसिध्द श्री. कपिलेश्वर महादेव मंदिराचा यात्रोत्सवाचे रविवार, 15 रोजी आयोजन करण्यात आले. कोरोना काळानंतर प्रथमच आयोजित यात्रोत्सवात भाविकांचा प्रचंड उत्साह दिसून आला. सकाळपासून मंदिरात दर्शनार्थ भाविकांची गर्दी झाली होती. दिवसभरात हजारो भाविकांनी कपिलेश्वर महादेवाचे दर्शन घेतले तर यात्रोत्सवाच्या माध्यमातून मोठी आर्थिक उलाढाल झाली.

उंचच उंच पाळणे दाखल
कंडारी यात्रोत्सवानिमित्त उंचच-उंच पाळणे दाखल झाले होते शिवाय बच्चे कंपनीसाठी आकाशपाळण्यासह मिकी माऊस, मिनी रेलगाडी, खेळण्यांची दुकाने थाटण्यात आली होती शिवाय महिला वर्गाची पसंती असलेल्या संसारोपयोगगी वस्तूंच्या दुकानांमध्ये दिवसभर गर्दी दिसून आली. विविध प्रकारच्या भांड्यांची यावेळी खरेदी करण्यात आली तर या माध्यमातून मोठी आर्थिक उलाढालही झाली. यात्रेत भाविकांची गुळाची जिलेबी, फरसाण, गरमागरम भज्यांना मोठी मागणी राहिली.

पोलिसांचा काटेकोर बंदोबस्त
यात्रोत्सवातील भाविकांची गर्दी पाहता चोर्‍या टाळण्यासाठी यापूर्वीच प्रशासनाने काटेकोर बंदोबस्ताचे नियोजन केले शिवाय मंदिरात 20 स्वयंसेवकांसह यात्रोत्सवात एक आरसीपी प्लॉटूनसह 70 पोलिस व होमगार्ड कर्मचार्‍यांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. भाविकांना दर्शनासाठी उत्तम व्यवस्था कपिलेश्वर महादेव मंदिर संस्थानने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !