दारूच्या नशेत विवाहितेशी अश्लील चाळे ; औरंगाबादचे सहा.आयुक्त विशाल ढुमे यांची नियंत्रण कक्षात बदली


molestation ; of a married woman under the influence of alcohol : Transfer of Asst.Commissioner Vishal Dhume to Control Room औरंगाबाद : दारूच्या नशेत धावत्या कारमध्ये विवाहित महिलेशी अश्लील चाळे केल्यानंतर महिलेच्याच बेडरूममधील वॉशरूम वापरण्यासाठी आग्रह करीत तिचा पती, दीर, सासूला शिवीगाळ व धक्काबुक्की करणार्‍या औरंगाबाद शहर पोलिस दलातील गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त विशाल ढुमे यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मंत्रालयात पाठवण्यात आला आहे. हा प्रकार शनिवारी मध्यरात्रीनंतर 2.30 वाजेच्या सुमारास घडला.

कारमध्ये महिलेसोबत केले अश्लील चाळे
पीडिता पती, मुलीसह एका रेस्टॉरंटमध्ये रात्री जेवण्यासाठी गेल्यानंतर ढुमे हेदेखील मित्रासह आले होते. पीडितेच्या पतीची ढुमेंसोबत ओळख असल्याने ढूमू यांनी पतीला पोलिस आयुक्तालयासमोर सोडण्याची विनंती केली. पावणेदोन वाजता सर्व कारने निघाल्यानंतर पीडिता पुढील सीटवर मुलीसह बसली असताना ढुमे यांनी मागच्या सीटवर मागून पीडितेसोबत अश्लील चाळे सुरू केले. नंतर ते पीडितेच्या घरी गेले. पीडितेच्या बेडरूममधील वॉशरूम वापरण्याचा आग्रह केला. ढुमे यांनी सासू आणि पतीला शिवीगाळ केल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आल्यानंतर ढुमे यांना नेण्यात आले.



तडकाफडकी बदली
पोलिस आयुक्त डॉ. गुप्ता यांनी एसीपी ढुमे यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली केली असून घटनेचा अहवाल गृह मंत्रालयाला पाठवला आहे. निलंबनाचा निर्णय गृह मंत्रालयस्तरावरच होणार आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !