जळगावातील सुंदर नगरात घरफोडी : 50 हजारांचा ऐवज लंपास


Burglary in Sunder Nagar in Jalgaon : 50 thousand instead of Lumpas जळगाव : शहरातील सुंदर नगर भागातील बंद घरातून चोरट्यांनी 50 हजारांचा ऐवज लांबवल्याची घटना 14 ते 15 जानेवारीदरम्यान घडली. या प्रकरणी शनीपेठ पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

बंद घर असल्याची साधली संधी
संदीप रामलाल चौधरी (38) हे कुटुंबासह सुंदर नगरात वास्तव्यास असून ते कुटुंबासह बाहेरगावी गेल्याने 14 ते 15 दरम्यान चोरट्यांनी संधी साधत बेडरूमच्या खिडकीचे लोखंडी गज वाकवत घरात प्रवेश केला. कपाटाच्या लॉकरमधून 12 हजार रुपये किंमतीची तीन ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, 18 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे झुमके, आठ हजार रुपये किंमतीचे दोन ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या बाह्या तसेच 11 हजारांची रोकड असा एकूण 49 हजारांचा ऐवज लांबवला. चौधरी हे बाहेरगावाहून आल्यानंतर चोरीचा प्रकार लक्षात आला. त्यांनी शनीपेठ पोलिसात दिलेल्या तक्रारीनंतर अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मुबारक तडवी करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !