गाडर्यातील विवाहितेची आत्महत्या : पतीसह दिराविरोधात गुन्हा
तु आवडत नाही, दुसरी बायको आणेल म्हटल्याने विवाहितेची आत्महत्या : दोघांविरोधात गुन्हा

यावल : यावल तालुक्यातील गाडर्या गावातील विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी पतीसह दोघांविरोधात यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
पतीच्या जाचाला कंटाळून केली आत्महत्या
गाडर्या येथील 30 वर्षीय विवाहिता करसना सुभाष बारेला या 2 जानेवारीपासून बेपत्ता झाल्यानंतर 12 जानेवारीला ती हरवल्याची नोंद करण्यात आली मात्र दुसर्याच दिवशी 13 जानेवारी रोजी विवाहितेचा जामन्याच्या रस्त्यावर वनक्षेत्रात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता. या प्रकरणी मयत विवाहितेचे वडील नकलसिंग गुटीया मेहता. (धुपा, ता.झिरन्या, जि.खरगोन, मध्यप्रदेश) यांनी सोमवारी दिलेल्या तक्रारीनुसार पती सुभाष बारेला व चुलत दीर अल्या गुमान बारेला याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी पती हा पत्नीला नेहमीच ती आवडत नसल्याचे हिणवून दुसरे लग्न करीत असल्याचे सांगून मारहाण करीत होता शिवाय या बाबीस चुलत दिर प्रोत्साहन देत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रदीप बोरूडे करीत आहे.