पिंपळकोठा गावानजीक भीषण अपघात : दोघे दुचाकीस्वार ठार
भरधाव मर्सिडीजने दुचाकीला उडवले : पिंपळकोठ्यात शोककळा
Horrific accident near Pimpalkotha village: Two bike riders killed एरंडोल : भरधाव वेगातील मर्सिडीज कारने दुचाकीला उडवल्याने झालेल्या अपघातात पिंपळकोठा बु.॥ गावातील दुचाकीस्वार दोघे तरुण ठार झाले. हा भीषण अपघात सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजता सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील पिंपळकोठा गावानजीक घडला. नितीन जामसिंग पाटील (21) व घनश्याम भानुदास बडगुजर (20, पिंपळगाव बु.॥) अशी मयतांची नावे आहेत. या प्रकणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
भरधाव मर्सिडीजने दुचाकीला उडवले
पिंपळकोठा गावापासून थोड्या अंतरावर भरधाव वेगाने नाशिककडे निघालेली मर्सिडीज (एम.एच.15 एच.वाय 0700) ने पिंपळकोठाकडून जळगावकडे जाणार्या दोघा तरुणांच्या नंबर प्लेट नसलेल्या दुचाकीस धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की दोघे युवक जागीच गतप्राण झाले तर पादचारी ज्ञानेश्वर गणसिंग पाटील (22) हे जखमी झाले. अपघातानंतर जि.प.चे माजी सदस्य नानाभाऊ पोपट महाजन, अशोक पाटील, राजेंद्र पाटील, मनोज पाटील, हरीभाऊ महाजन, अशोक बडगुजर व इतर ग्रामस्थांनी धाव घेत मदतकार्य केले. जखमी ज्ञानेश्वर पाटील या युवकास पुढील उपचारार्थ जळगावी हलविण्यात आले आहे.


