मोठी बातमी : अॅड.प्रवीण चव्हाणांसह तिघांविरोधात पुण्यात खंडणीचा गुन्हा
Big News : Extortion case in Pune against three including Adv. Praveen Chavan पुणे : पेन ड्राईव्ह बॉम्बमुळे चर्चेत आलेले तत्कालीन सरकारी वकील प्रवीण चव्हाण हे पुन्हा एकदा खंडणीच्या गुन्ह्यात संशयीत आरोपी झाल्याने चर्चेत आले आहेत. फसवणूक आणि खंडणी मागितल्याप्रकरणी अॅड.चव्हाण यांच्यासह जळगावातील शेखर सोनाळकर, चाळीसगावातील उदय पवार यांच्याविरोधात पुण्यातील डेक्कन पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप !
सुरज झंवर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचे व वडिलांचे वेयर हाउसिंग, अन्नधान्य व किराणा मालाचे सरकारी सप्लायर असे वेगवेगळे व्यवसाय आहेत. जळगाव येथे प्रमोद रायसोनी यांनी स्थापन केलेल्या भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी. संदर्भात अतिरिक्त सचिव तथा केंद्रीय निंबधक सहकार विभाग, केंद्र सरकार नवी दिल्ली यांनी सदरची संस्था ठेवीदारांचे पैसे परत करण्यास असमर्थ झाल्यामुळे दिनांक 27 ऑक्टोबर 2015 रोजी लिक्वीडेटर जितेंद्र गुलाबराव कंडारे यांची नेमणुक केलेली होती. सदरील लिक्वीडेटर यांनी मल्टीस्टेट क्रेडीट कोपरेटीव्ह सोसा. अधिनियम 2002 अन्वये कार्यवाही’ करुन सदरील संस्थेच्या मालमत्ता विकून तसेच वसुली पोटी कर्जदारांच्या मालमत्ता जप्त करून, त्या जाहीर ई लिलावाद्वारे विकून ठेवीदारांची देणी परत करण्याची कार्यवाही करत असताना, केवळ राजकीय हेतुने कलुषित होऊन काही पोलीस अधिका-यांना हाताशी धरुन दिनांक 25 नोव्हेंबर 2020 रोजी एकाच दिवशी डेक्कन पोलीस स्टेशन पुणे’ येथे गु.र.क्र 673/2020 भादंवि कलम 420, 464, 465, 467, 468, 471, 406, 409, 474, 477अ, 225, 120 (ब), 34, सह महाराष्ट्र ठेविदारांच्या हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम 1999 चे कलम 03 अन्वय तसच आळंदी पो.स्टे व शिक्रापुर पो. ठाणे या तीन ठिकाणी वरिल एकाच विषयावर तीन वेगवेगळे खोटे गुन्हे दाखल केलेत.


चाळीसगावच्या मध्यस्तीमार्फत मागितली खंडणी !
अॅड.प्रवीण चव्हाण यांनी त्रयस्थ इसमातर्फे मला निरोप दिला की, तुझ्या वडीलांची चार पाच वर्षे जेलमध्ये वाट लावुन टाकतो मी यापुर्वी सुरेशदादा जैन, डिएसकेचे कुलकर्णी व इतर आरोपींची देखील अशीच वाट लावलेली आहे. तुमच्या कुटुंबियांची जप्त केलेली बँक खाती पुढील दहा वर्षात मुक्त होऊ देणार नाही. तेव्हा काहीतरी पुर्तता कर तरच फायदा होईल. अन्यथा आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल. मध्यस्थ इसमाने मला स्पष्टपणे सांगितले की, तुझे सरकारी वकील अॅड.प्रवीण चव्हाण यांनी चाळीसगाव येथील ओरीजनल वाईन शॉपचे मालक उदय नानासाहेब पवार याच्यामार्फत हा निरोप पाठविला आहे. व त्यासंदर्भात योग्य तो निर्णय तुझा तु घेऊन टाक. माझा या प्रकरणाशी काहीएक संबंध नाही.
डेक्कन पोलिसात गुन्हा दाखल
या प्रकरणी सूरज झंवर यांनी डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये 1 कोटी 20 लाखांची खंडणी मागितल्याची तक्रार दिल्यानंतर अॅड.प्रवीण चव्हाण यांच्यासह तिघांविरोधात फसवणूक आणि खंडणी सारख्या अनेक कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. भादंवि कलम 166, 213, 384, 385, 386, 388, 506, 34, 120 ब अंतर्गत त्यांच्यावर डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
