पातोंडानजीक जुगाराचा डाव उधळला : पाच जुगार्यांवर कारवाई
Gambling scheme foiled near Patonda: Action against five gamblers चाळीसगाव : तालुक्यातील पातोंडा गावाजवळ झन्ना-मन्ना नावाचा जुगार सुरू असलयाची माहिती चाळीसगाव शहर पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी रविवारी दुपारी दोन छापा टाकत पाच जुगारींना ताब्यात घेतले. संशयीताकडून जुगाराची साधने व 31 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ही कारवाई पोलीस निरीक्षक के.के.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दीपक पाटील, राहुल सोनवणे, भूषण पाटील, विनोद खैरनार, निलेश पाटील, विजय पाटील, रवींद्र बच्छे, प्रवीण जाधव, सुनील निकम यांच्या पथकाने केली.


