तळवेल गावातील अल्पवयीन मुलाला फूस लावून पळविले
A minor boy of Talvel village was lured and abducted भुसावळ : भुसावळ तालुक्यातील तळवेल येथील पियुष सारंग पाटील (17.7 महिने) या अल्पवयीन बालकास अज्ञाताने फुस लावून पळवून नेल्याचा प्रकार 30 डिसेंबर रोजी घडली. या प्रकरणी सोमवारी वरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
अज्ञाताविरोधात गुन्हा
भुसावळ तालुक्यातील तळवेल येथे पियुष सारंग पाटील हा अल्पवयीन तरुण परीवारासह वास्तव्यास होता. 30 डिसेंबर रोजी दुपारी एक वाजता घरी असताना पियुषला अज्ञाताने फूस लावून पळवून नेले. पियुषचा सर्वत्र शोध घेण्यात आला मात्र तो कुठेही आढळला नसल्याने सरस्वती सारंग पाटील (37) यांनी मुलाला पळवून नेल्याची तक्रार दाखल केल्याने अज्ञाताविरोधात वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपनिरीक्षक परशूराम दळवी करीत आहेत.


