भुसावळातील ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये उद्यापासून दोन दिवसीय स्नेहसंमेलन
भुसावळ : शहरातील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये बुधवार, 18 व गुरुवार, 19 रोजी दोन दिवसीय स्नेहसंमेलनचे आयोजन करण्यात आले आहे.
यांची राहणार प्रमुख उपस्थिती
प्रमुख पाहुणे म्हणून भुसावळचे डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, डॉ.सुरज भोळे, ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मोहन फालक, चेअरमन महेश फालक, सेक्रेटरी विष्णू चौधरी,संजय नाहाटा, प्रिन्सिपल निना कटलर आदींची उपस्थिती राहणार आहे. सकाळी 10 वाजता कार्यक्रमाला सुरुवात होईल. नर्सरी ते चौथीपर्यंतचे विद्यार्थी कलागुणांचे सादरीकरण करतील. गुरुवार, 19 रोजी ट्रामा सेंटरचे मेडिकल ऑफिसर डॉ.मयूर चौधरी, जवाहर नवोदयचे प्रिन्सिपल आर.आर.खंडारे, जळगाव केंद्रीय विद्यालयाचे प्रिन्सिपल मैथ्यू अब्राहम, सिक्रेट हार्ट चर्चचे फादर आजो यांची उपस्थिती राहणार आहे. संध्याकाळी पाच वाजता स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल. त्यात पाचवी-दहावीचे विद्यार्थी कलागुणांची उधळण करतील, असे प्रिन्सिपल निना कटलर यांनी कळविले आहे.


