राज्यस्तरीय पोलिस क्रीडा स्पर्धेत जळगावचा डंका

सात पदके पटकावली : खेळाडूंचा अपर पोलिस अधीक्षकांकडून सन्मान


जळगाव : पुणे येथे नुकत्याच झालेल्या 33 व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेत जळगावातील पोलीस खेळाडूंनी सात पदके पटकावत चमकदार कामगिरी केली. यशस्वी खेळाडूंचा अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला.

सात पदके पटकावली
जळगाव पोलिस अधीक्षक एम.रामकुमार , सह अधिकारी अंमलदार यांच्या संघाने जिल्हा व नाशिकस्तरीय स्पर्धेत चमकदार कामगिरी केल्यानंतर खेळाडूंची राज्य स्पर्धेसाठी निवड झाली व तेथे खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. त्यात संतोष सुरवाडे यांनी बॉक्सिंगमध्ये सुवर्ण पदक, प्रशांत सोनार यांनी बॉक्सिंगमध्ये रौप्य पदक पटकावले. समीर सैय्यद यांनी बास्केटबॉलमध्ये रौप्य पदक , रवींद्र वंजारी यांनी शरीरसौष्ठवमध्ये रौप्य पदक तसेच जागृती काळे यांनी शरीरसौष्ठवमध्ये रौप्य पदक मिळवले शिवाय पंकज रामचंद्र शिंदे यांनी वुशूमध्ये कांस्य पदक व सुनील मोरे यांनी वुशू मध्ये कांस्य पदक प्राप्त पटकावले. या खेळाडूंची आता राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांसाठी निवड होणार आहे.



यशस्वी खेळाडूंचा सन्मान
यशस्वी खेळाडूंचा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उपाधीक्षक (गृह) संदीप गावीत व राखीव पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे यांनी अभिनंदन रोख बक्षिसे देवून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. दरम्यान, पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी पुणे येथे 33 व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेत 42 किलोमीटर मॅरेथॅान स्पर्धेत सहभाग नोंदवून 42 किलोमीटर मॅरेथॅान स्पर्धा पूर्ण केल्याने अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उपाधीक्षक (गृह) संदीप गावित यांनी पुष्पगुच्छ देवून जिल्हा पोलीस दलातर्फे त्यांचे अभिनंदन केले. दरम्यान, यशस्वी खेळाडू यांना स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा पोलीस क्रीडा प्रमुख तथा पोलीस उपनिरीक्षक सम्रत वाघ, ज्ञानेश्वर बागुल, मनोज सुरवाडे यांचे मार्गदर्शन लाभले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !