ट्रॅक्टरने शेतकर्‍याला चिरडल्याचा आरोप : दोषींवर कारवाईसाठी मृतदेह अमळनेर तहसील कार्यालयात


Accused of crushing a farmer with a tractor: body in Amalner tehsil office for action against culprits अमळनेर : अमळनेर तालुक्यातील मांडळ येथे शेतकर्‍याच्या अंगावरून ट्रॅक्टरने गेल्यानंतर शेतकर्‍याचा मृत्यू झाला. या घटनेतील दोषींवर कारवाई करावी याबाबत मंगळवारी नातेवाईकांनी मयत शेतकर्‍याचा मृतदेह थेट अमळनेर तहसील कार्यालयात आणला. जयवंत यशवंत कोळी (36) असे मयत शेतकर्‍याचे नाव आहे.

ट्रॅक्टर अंगावरून गेल्याने मृत्यू
मांडळ येथे भाल्या नाला परीसरात यशवंत यशवंत कोळी यांची शेती आहे. ते रात्री शेतात पाणी देण्यासाठी गेले होते. सकाळी त्यांच्या अंगावरून ट्रॅक्टर नेल्याने ते गंभीर जखमी झाले. यानंतर नातेवाईक आणि इतर लोकांनी प्रथम स्थानिक डॉक्टरांकडे उपचारसाठी नेले मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना धुळे जिल्हा सरकारी रुग्णालयात नेण्यात आले मात्र रुग्णालयात नेल्यावर थोड्या वेळातच त्यांची प्राणज्योत मालवली.



अपघात नसून ही तर हत्याच
जयवंत यांचा अपघात नसून त्यांचा हत्या झाली आहे. त्याचा जीव घेणार्‍यांवर गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यांना तात्काळ अटक करावी. या मागणीसाठी कुटुंबीयांनी आज थेट जयवंत याचा मृतदेह रुग्णवाहिकेतून अमळनेर तालुक्यातील तहसील कार्यालयात नेला. जोपर्यंत दोषींवर गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह घेऊन जाणार नाही,. असा आक्रमक पवित्रा मयत जयवंत यांच्या नातेवाईकांनी घेतला. दरम्यान, यावेळी मयत जयवंत यांची पत्नी तसेच कुटुंबियांनी मोठा आक्रोश केला. नातेवाईकांच्या आक्रमक पावित्र्यानंतर या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात येऊन काही जणांना ताब्यात घेतले असून इतरांनाही अटक केली जाईल, असे आश्वासन दिल्यावर नातेवाईकांनी जयवंत यांचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी गावाकडे नेला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !