कंडारीतील अंगणवाडी सेविकेची आत्महत्या


Anganwadi worker suicide in Kandari भुसावळ : तालुक्यातील कंडारी गावातील अंगणवाडी सेविकेने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येचे स्पष्ट कारण कळू शकले नाही. या प्रकरणी भुसावळ शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सीमा रामभाऊ तायडे (41, राजपूतवाडा, कंडारी) असे मयताचे नाव आहे.

दुपारच्या सुमारास घेतला गळफास
कंडारी गावात सीमा तायडे या वास्तव्यास होत्या व अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत होत्या. मंगळवारी दुपारी दिड वाजेच्या सुमारास त्यांनी राहत्या घरातील स्टोअर रूमच्या अँगलला ओढणीने गळफास घेतला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर शहर पोलिसांना माहिती कळवण्यात आल्यानंतर त्यांनी धाव घेत पंचनामा करीत मृतदेह रुग्णालयात हलवला. या प्रकरणी कृष्णा लोटू तायडे (55, राजपूतवाडा, कंडारी) यांच्या खबरीनुसार भुसावळ शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. दरम्यान, मृत विवाहितेच्या पश्चात पती, दोन मुले, सासू असा परीवार आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !