भुसावळातील अल्पवयीन मुलीस पळवले


A minor girl was abducted from Bhusawal भुसावळ : शहरातील एका भागातील रहिवासी असलेल्या अल्पवयीन मुलीस अज्ञाताने फूस लावून पळवून नेल्याचा प्रकार सोमवारी दुपारी शहरातील आयटीआय कॉलेजजवळ घडला. या प्रकरणी अज्ञाताविरोधात भुसावळ शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञाताविरोधात गुन्हा
शहरातील रेल्वे फिल्टर हाऊस भागातील 16 वर्षीय अल्पवयीन तरुणीला सोमवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास अज्ञाताने काहीतरी आमिष दाखवून पळवून नेले. सर्वत्र शोध घेवून अल्पवयीन तरुणीचा शोध न लागल्याने तरुणीच्या आईने शहर पोलिस ठाणे गाठत तक्रार दिल्यानंतर अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक गजानन पडघण यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय ईकबाल सैय्यद करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !