जळगावातील अट्टल गुन्हेगार शेख जुनेद दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार
Inveterate criminal Sheikh Junaid of Jalgaon banished from the district for two years जळगाव : सामाजिक शांततेला अडसर ठरू पाहणार्या उपद्रवींविरोधात पोलिस प्रशासनाकडून हद्दपारीच्या कारवायांना वेग दिला आहे. विविध प्रकारचे पाच गंभीर गुन्हे दाखल असलेल्या शेख जुनेद उर्फ बवाली शेख युनूस (26, नवीन तांबापूरा, बिलाल चौक, जळगाव) यास जळगाव जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. याबाबत बुधवार, 18 जानेवारी रोजी प्रांताधिकारी महेश सुधाकर यांनी आदेश काढले आहेत.
एमआयडीसी पोलिसांनी तयार केला प्रस्ताव
एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत शेख जुनेद याच्या विरोधात हद्दपारीचा प्रस्ताव एमआयडीसी पोलिसांनी तयार करून उपविभागीय अधिकारी कार्यालयात पाठवला होता. या गुन्हेगारावर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, आनंदसिंग पाटील, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, योगेश बारी, सचिन पाटील यांनी याबाबतचा प्रस्ताव सादर केल्यानंतर प्रांताधिकार्यांनी आरोपीच्या हद्दपारीचे आदेश काढले आहेत.


