भुसावळातील ताप्ती स्कूलच्या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी दाखवली कलागुणांची झलक
भुसावळ : शहरातील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दोन दिवसीय स्नेहसंमेलनाला बुधवारपासून सुरूवात झाली. भुसावळचे डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी व्दीपप्रज्वलनाने स्नेहसंमेलनाचे उद्घाटन केले. यावेळी डॉ.सुरज भोळे, चेअरमन महेश फालक, सेक्रेटरी विष्णू चौधरी, प्रिन्सिपल निना कटलर आदींची उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांनी दाखवली कलागुणांची झलक
यावेळी प्रिन्सिपल नीना कटलर यांनी शाळेसंबंधी तसेच गुणवंत विद्यार्थ्यांबाबत माहिती दिली. इयत्ता नर्सरी ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी प्रसंगी कलागुणांचे सादरीकरण केले. विद्यार्थ्यांनी यही उमर है बल्ले, भांगडा, कोळीगीत, पंजाबी साँग, इतनीसी हसी, साऊथ इंडीयन साँग, बुमरो बुमरो, टूकूर टूकूर देख टका टक, छोटीसी आशा, ब्राझिल, रासलीला, घुमर घुमर व अशा वेगवेगळ्या 46 गाण्यांवर शाळेतील दीड हजार विद्यार्थांनी धम्माल केली. ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मोहन फालक व संजय नाहाटा यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचलन सोनाली मुजुमदार तर आभार प्रिंसीपल निना कटलर यांनी मानले. स्नेहसंमेलन यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक वर्ग व अन्य शिक्षकेतर कर्मचार्यांनी परीश्रम घेतले.


आजही होणार कलागुणांचे सादरीकरण
गुरुवार, 19 रोजी ट्रामा सेंटरचे मेडिकल ऑफिसर डॉ.मयूर चौधरी, जवाहर नवोदयचे प्रिन्सिपल आर.आर.खंडारे, जळगाव केंद्रीय विद्यालयाचे प्रिन्सिपल मैथ्यू अब्राहम, सिक्रेट हार्ट चर्चचे फादर आजो यांच्या उपस्थिती सायंकाळी पाच वाजता स्नेहसंमेलनाला सुरूवात होईल.
