साकळी येथे अल्पवयीन विद्यार्थिनीचा एकाने केला विनयभंग
A minor girl student was molested by someone in Sakli यावल : तालुक्यातील साकळी येथे बाहेर गावावरून शिक्षणासाठी येणार्या अल्पवयीन विद्यार्थिनींचा गावातील एका तरुणाने रस्ता अडवत विनयभंग केला. या प्रकरणी संबधीत तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
संशयीत तरुणाविरोधात यावल पोलिसात गुन्हा
साकळी येथे एका हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी किनगाव येथून अल्पवयीन विद्यार्थिनी दररोज एसटीद्वारे येते. बुधवारी काही विद्यार्थिनी एसटी बसने फाट्यावर उतरल्यानंतर गावाकडे पायी निघाल्यानंतर रस्त्यातच साकळी गावातील आबा उर्फ दीपक वसंत मराठे याने विद्यार्थिनीचा रस्ता अडवत तिची छेड काढत विनयभंग केला. घाबरलेल्या अवस्थेत विद्यार्थीनींनी शाळेत पोहोचल्यावर हा संपूर्ण प्रकार आपल्या शिक्षकांना सांगितला व शिक्षकांनी पालकांना याबाबत माहिती दिली. संतप्त पालकांनी यावल पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिल्यानंतर आरोपी आबा उर्फ दीपक वसंत मराठे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुदाम काकडे, हवालदार सिकंदर तडवी करीत आहे.


