एक कोटी 22 लाखांचे खंडणी प्रकरण : पुण्यातील गुन्हा चाळीसगाव पोलिसात वर्ग

एलसीबी निरीक्षक किसनराव नजन-पाटील करणार गुन्ह्याचा तपास


One Crore 22 Lakh Extortion Case: Crime in Pune Classified in Chalisgaon Police जळगाव : झंवर पिता-पूत्रांवर मोक्का लावण्याची धमकी देत कारवाई न करण्यासाठी दोन कोटींची खंडणी मागून त्यातील एक कोटी 22 लाख रुपये स्वीकारल्याप्रकरणी तत्कालीन सरकारी वकील अ‍ॅड.प्रवीण चव्हाण यांच्यासह शेखर सोनाळकर व उदय पवार यांच्याविरोधात पुण्यातील डेक्कन पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र गुन्ह्याचे कार्यक्षेत्र चाळीसगाव असल्याने हा गुन्हा तपासार्थ वर्ग करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील करीत आहेत.

दोन कोटींची मागितली होती खंडणी
बीएचआर मल्टीस्टेट को.ऑप सोसायटी गैरव्यवहार प्रकरणात सुनिल झवर यांना जामीन मिळण्याकामी सहकार्य करण्याचे आश्वासन तसेच दोघा झंवर पिता-पूत्रांना मोक्काच्या गुन्ह्यात अडकवण्याची भीती घालून दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी अ‍ॅड.प्रवीण चव्हाण यांच्यासह तिघांविरोधात पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र गुन्ह्यातील खंडणीची रक्कम व सुरूवात चाळीसगावात झाल्यानेहा गुन्हान चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला वर्ग करण्यात आला.

गुन्हे शाखा निरीक्षक करणार तपास
दोन कोटी रुपयांच्या मागणीपैकी सुरज झंवर याच्याकडून संगनमताने एक कोटी 22 लाख रुपये चाळीसगाव येथील उदय पवार यांच्या मालकीच्या ओरीजनल वाईन शॉप येथे वसुल करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे आहे तर या रकमेतील एक कोटी रुपये अ‍ॅड.प्रवीण चव्हाण यांनी तर 20 लाख रुपये मध्यस्ती करणार्‍यान व दोन लाख रुपये हवालाच्या मोबदल्यात घेतल्याचे झंवर यांनी तक्रारीत नमूद केले आहे. या प्रकरणी अ‍ॅड.चव्हाण, उदय पवार आणि शेखर सोनाळकर यांच्याविरुद्ध चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला भाग 5 गु.र.न. 25/23 भा.द.वि. 384, 385, 388, 386, 166, 213, 506, 120 (ब), 34 या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास जळगाव गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजन पाटील करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !