शिष्यवृत्ती व बारावीनंतर आता दहावीच्या परीक्षेचा शुभारंभ ही सदोष प्रश्नपत्रिकेनेच !

भुसावळातील शिक्षणतज्ज्ञ प्र.ह.दलाल यांचा आरोप


After the scholarship and the 12th, now the 10th exam starts with the faulty question paper! भुसावळ : गत महिन्यात झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत व बारावीच्या मराठी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत केलेल्या गंभीर चुकांची पुनरावृत्ती गुरुवारपासून सुरू झालेल्या दहावीच्या मराठी विषयाच्या प्रश्नपत्रिकेतही झालेली दिसून आली. पहिल्याच पानावर दिलेल्या सूचनेत लेखन नियमानुसार लेखन याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे हेच वाक्य मुळात प्रश्नपत्रिकेत विद्यमान लेखन नियमानुसार नाही हाच मोठा विनोद झाल्याचे दिसून आले आहे.

चुकीच्या पद्धत्तीने केले लेखन
राज्य शासनाने 9 व 10 नोव्हेंबर 2022 रोजी काढलेल्या आदेशानुसार गाठयुक्त (श) व ल असा न लिहिता असे लिहावे आणि जोडाक्षरे पारंपरीक पद्धतीनेच लिहावीत तसेच तोडा क्ष र पद्धती वापरू नये, असेही म्हटले आहे. उदा जिददी, दविगू, पद धत, असे न लिहिता जिद्दी, द्विगू, पद्धत, मात्र याकडेही दुर्लक्ष झाले आहे. द हे व्यंजन जोडाक्षर च्याआधी आल्यास व त्यापुढे य आल्यास द्य लिहावे. उदा उद्या, विद्या मात्र प्रश्नपत्रिकेत सर्वत्र गदय, पदय, दयावें, असे चुकीच्या पद्धतीने लेखन केले आहे. लेखन कौशल्य यात पाठ्युस्तकांमध्ये असलेला नमुनाच दिला आहे. दुसरा देता आला नसता का? व्याकरण विभागात 7 वी, 8 वी चे विद्यार्थीही सहज सोडवू शकतील इतके सोपे प्रश्न बारावीच्या विद्यार्थ्यांना विचारुन निकाल उंचावण्याची सोय तर केलेली नाही ना? अशी शंका दलाल यांनी उपस्थित केली आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !